पत्रकार राजदीप सरदेसाईंवर कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्यावर चॅनलने मोठी कारवाई केली आहे. सरदेसाई यांनी प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात खोटी बातमी पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या कारणामुळे त्यांच्यावर कारवाई केली प्रजासत्ताक दिनाला राजदीप सरदेसाई यांनी नवनीत नावाच्या एका आंदोलकाचा फोटो टाकला होता. आणि म्हटलं होतं की दिल्ली पोलिसांच्या गोळीबारामध्ये यांचा मृत्यू झाला आहे. पुढे त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

तसेच त्यांनी तिरंग्याने अच्छादलेला मृताचा फोटो देखील ट्विट केला होता. मात्र, या आंदोलकाचा मृत्यू बॅरिकेड तोडताना झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती दिली गेली आहे. याबाबत त्यांना विचारणा केली गेल्यावर ट्विटरवरुन त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. नंतर त्यांनी इंडिया टुडे चॅनेलवर लाईव्ह जाऊन पुन्हा खोटं बोलून पोलिसांच्या गोळीबारात त्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचेच सांगितले.

म्हणून चॅनेलने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सरदेसाई यांच्या त्या चुकीच्या ट्विट मुळे चॅनेल ने त्यांना दोन आठवडे ऑफ एअर म्हणजे दोन आठवडे टीव्हीवर येऊन बातम्या सांगण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर राजदीप यांचा एका महिन्याचा पगार देखील कापला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!