पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी घेतली आमदार काळेंच्या मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-विधानसभा मतदार संघातील ओव्हरलोड रोहित्र बदलणेसाठी व कमी दाबाच्या वीज वाहिन्या, पोल स्थलांतरीत करण्यासाठी निधी द्यावा या आमदार आशुतोष काळे

यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जवळपास दीड कोटी रुपये निधी मंजूर केले आहे,

अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांतील रोहीत्रांवर ओव्हर लोड असल्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र नादुरुस्त होणे या समस्या नित्याच्याच झाल्या होत्या.

अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे पोल व वीज वाहिन्या स्थलांतरीत करण्याची कामे होत नव्हती. या शेतकऱ्यांनी जनता दरबारात मांडलेले या समस्यांची दखल घेत आ.काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.

त्याला यश मिळाले असून यामध्ये भोजडे पाणीपुरवठा योजनेसाठी अक्षय प्रकाश योजनेंतर्गत नवीन वीजवाहिनी टाकून नवीन रोहित्र बसविणे, आढाव वस्ती व जानकी विश्व कोपरगाव येथील ३३ के.व्ही. कोळपेवाडी वीजवाहिनी स्थलांतरित करणे,

वडांगळे वस्ती कोपरगाव येथील ३३ के.व्ही. कोळपेवाडी वीजवाहिनी स्थलांतरित करणे, ३३ के.व्ही. संवत्सर वीजवाहिनी ओव्हरहेड ते भूमिगत करणे तसेच जगताप वस्ती रोहित्र स्थलांतरीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ५२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

तसेच ओव्हर लोड रोहीत्रांवर असलेला लोड कमी करण्यासाठी नवीन २८ रोहित्रांना मंजुरी देवून एक कोटी अठरा लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून असा एकूण दीड कोटी रुपये निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला जिल्हा नियोजन मधून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button