चावट आमदार…विधानपरिषदेत पाहत होते अश्लील व्हिडीओ

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड यांच्यावर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा आरोप होत आहे.

राठोड हे आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्यांच्या फोनमध्ये अश्लिल व्हिडीओ असल्याचे दृष्य कॅमेरात कैद झाली आहे.

राठोड यांनी यासंर्भात प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिले. इंटरनेटवर मी काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत असल्याचे राठोड म्हणाले आहेत.

सभागृहामध्ये मी सामान्यपणे मोबाईल घेऊन जात नाही. पण मला या सत्रामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मी याच कारणासाठी मोबाईल घेऊन आलो होते.

मी त्याचसंदर्भात मोबाईल चेक करु लागलो. त्यावेळी माझ्या मोबाईलची मेमरी फूल झाल्याचे दिसल्यानंतर मी मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप डिलीट करु लागलो, असे राठोड सांगतात.

प्रकाश राठोड यांच्यावरील आरोपानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याआधी देखील 2012 मध्ये लक्ष्मण सावदी आणि इतर दोन आमदार सभागृहाच्या आतमध्ये सदनाची कारवाई सुरु असताना अश्लील व्हिडीओ पाहताना कॅमेरात कैद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button