शिवसेनेचे मंत्री घरी पाठवले विसरले काय ? अण्णा हजारे गरजले!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-समाज्याच्या प्रश्नासाठी जगत असून ज्या वेळी  समाजात अन्याय, अत्याचार होतो;  त्या वेळी त्या विरोधात समाज, राज्य व राष्ट्र हितासाठी मी आंदोलने करत आलोय.

पक्ष, पाट्या मी कधी पाहत नाही. तुमच्या काळात तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत होतात तेव्हाही मी आंदोलने केले. त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले ना, विसरलात काय? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिवसेनेला केला आहे.

हजारे यांनी आंदोलन स्थगित करण्याची भुमिका घेतल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकाच्या अग्रलेखात “काँग्रेसच्या काळात आंदोलने केली, आता काय रामराज्य आलं काय? ” अशी टीका हजारे यांच्यावर करण्यात आली.

याबाबत विचारले असता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अण्णा  हजारे यांनी त्या आरोपांचा समाचार घेतला   . या वेळी अण्णा हजारे म्हणाले, की तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कशी पाठीशी घातले. याची मी सर्व माहिती देईल. समाज व देशाच्या वेगवेगळ्या विषयावर मी आंदोलने केले.

दिल्लीतील भाजपच्या केंद्र सरकारविरोधात सन २०१४ पासून अनेक वेळा पत्रव्यवहार करून या सरकार विरोधात आतापर्यंत माझी सहा आंदोलने झाली आहेत. दिल्लीतील रामलिला व जंतरमंतरवर वन रँक वन पेन्शनसाठी व भूमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतक-यांचे प्रश्न व लोकपाल- लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले.

तसेच राळेगणसिद्धीतही सन २०१९ मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय, असा सवाल करत हजारे यांनी सामनाच्या अग्रलेखातील टिकेला उत्तर दिले. समाजातील अन्यायाविरोधात तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात गेल्या चाळीस वर्षांत आजपर्यंत २० वेळा उपोषण केले.

छोटी मोठी अनेक आंदोलने केलीत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले. त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचेही आहेत. सर्वच पक्षांविरोधात माझी आंदोलने झाली आहेत. मी पण पक्ष पाट्या कधी पाहून कधी आंदोलने केली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button