नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई; थकबाकीदार व्यापाऱ्यांचे गाळे सील

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी काही गाळ्यांचे 8 ते 9 वर्षांपासूनचे थकीत भाडे, काहींचे 5-6 वर्षांचे थकीत भाडे होते.

तसेच आज पासून आम्ही कारवाई ची भुमिका हाती घेतली आहे व थकबाकी असताना सुद्धा गाळे धारक भाडे भरीत नसल्यामुळे जामखेड येथे दंडवते यांनी काही गाळयांवर कारवाई करण्यात आली व सिल लावण्यात आले. तसेच नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की ज्याच्या कडे थकबाकी आहे.

त्यानी लवकरात लवकर आपली थकबाकी भरावी व कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काही गाळयांवर कारवाई करीत असताना काही गाळेधारकांनी स्वत हुन पैसे भरण्यास सुरुवात केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!