कोपरगाव तालुक्यातील ‘या’ रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

त्या पाठपुराव्यातून टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी नाबार्डकडून २ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Advertisement

याबाबत आमदार काळे यांनी सांगितले, की कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.

त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या रवंदे, टाकळीच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे नागरिकांनी घातलेले साकडे, त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता.

Advertisement

मतदारसंघातील खराब रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोरोना संकटातदेखील अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी आमदार काळे प्रयत्नशील असून त्या प्रयत्नांना अपेक्षित यशदेखील मिळत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button