मागील भांडणाच्या कारणावरून ऊस पेटवला, तिघांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-मागील भांडणाच्या कारणावरुन तिघा जणांनी पाच एकर ऊस जाळण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे घडला आहे.

याबाबत मंदा ज्ञानदेव विखे (वय-३५, रा.सोनविहीर ता. शेवगाव) यांनी फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरुन याच दोन गटातील १४ जणांवरीध्द गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मंदा विखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती ज्ञानदेव, मुलगा प्रशांत,

मुलगी प्रतिक्षा आम्ही असे आम्ही एकत्र राहतो. पती ज्ञानदेव व दिर नामदेव विखे यांच्या नावावर गट नंबर १४३ मध्ये अडीच अडीच एकर अशी एकुण पाच एकर शेतजमीन आहे.

त्यात संपूर्ण ऊस लागवड केली आहे. शुक्रवार ता.२९ रोजी रात्री ९ वाजता गावातील तुळशीराम हरिभाऊ विखे यांनी माझ्यासमोर सुदाम पांडूरंग तिडके, अमोल शिवाजी तिडके, हरिभाऊ कडुबा शिंदे यांनी जाळून टाकल्याचे सांगितले.

जाव शोभा विखे मी शेतात जावून पाहीले असता तेरा महिन्याचा संपूर्ण पाच एकर ऊस जळून गेला होता. त्यामुळे वरील तिघांनी मागील भांडणाच्या कारणावरुन ऊस जाळला असून अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे पोलीसांनी तिघा जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पुढील तपास पो.ना. सतोष धोत्रे हे करीत आहेत.

Leave a Comment