कुलदीपने समुद्रापार फडकवला कोपरगावचा झेंडा !

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदीप संदीप कोयटे याने केयॉन विझकिडस् या जागतिक पातळीवरील स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवल्याची माहिती प्राचार्य लिसा बर्धन यांनी दिली.

उपप्राचार्य विलास भागडे म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते. आंतरशालेय ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारावी लागते. अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते.

कुलदीप ‘व्यक्तिमत्त्व स्पर्धा’ या प्रकारात आहे. यात शालेय शिक्षणाबरोबरच अंगभूत कलागुणांची दखल घेतली जाते.कुलदीपचे अभिनय कौशल्य, छंद, आवड-निवड, स्वभाव, संभाषण कौशल्य,

तसेच समता लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्ष म्हणून राबवलेल्या सामाजिक मोहिमा, पथनाट्ये सादरीकरण, वक्तृत्वावरील पकड, गिटार वादन यांचा विचार केला गेला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांसमोर कलागुणांचे सादरीकरण करत कुलदीपने कोपरगावचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला. थायलंडमधील स्कुबा ड्रायव्हिंगमधील सहभागासाठी कुलदीपचे नाव यापूर्वीच ‘गिनीज बुक’ मध्ये नोंदवले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button