Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

नव्या कृषी कायद्यांचे असे आहेत दुष्परिणाम

374

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून देशात सध्या वातावरण तापलं आहे. ‘केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमुळे MSP खरेदी पायभूत सुविधेवर विपरीत परिणाम होईल आणि मंडी व्यवस्था कमकुवत होईल.

अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एपीएमसी आणि मंडी व्यवस्थेबाबत भाष्य केलं आहे. ‘बदल ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एपीएमसी आणि मंडी व्यवस्थेतील बदलांबाबत कोणीही वाद घालणार नाही, मात्र याबाबत कोणीही सकारात्मक प्रतिवाद केला तर त्याचा अर्थ असा नाही की ही व्यवस्था कमकुवत करण्यासाठी केलं गेलं आहे,’ असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

Advertisement

खरंतर किमान आधारभूत किंमत अर्थात MSP निश्चित करून ही व्यवस्था आणखी मजबूत करायला हवी,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. धान्य, डाळी, कांदा, बटाटा आणि तेलबिया याच्या साठ्याविषयीची मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत.

मात्र या निर्णयामुळे उद्योगपती हे वस्तू कमी किंमतीत खरेदी करून त्याची साठेबाजी करतील आणि जास्त भावात ग्राहकांना त्याची विक्री करतील, अशी भीती आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी वस्तूंच्या साठ्याबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. ‘

Advertisement

सुधारित जीवनावश्यक वस्तू कायद्याबाबतही मला चिंता आहे. कारण या नव्या कायद्यानुसार उत्पादनांचे भाव १०० टक्के आणि नाशवंत वस्तूंच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या तरच सरकार किंमत नियंत्रणासाठी हस्तक्षेप करेल,’ असंही शरद पवार यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

Advertisement