Budget 2021 : काय होणार स्वस्त? आणि काय महागणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सर्वच क्षेत्रात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

काय होणार स्वस्त?
>> स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
>>सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
>> तांब्याच्या वस्तू
>> चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

काय महागणार?
>> मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्यानं मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत.
>> परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
>> परदेशातून आयात केले जाणारे कपडे
>> कॉटनचे कपडे महागणार

कोणत्या क्षेत्राला किती कोटी

+ आरोग्य क्षेत्रासाठी २.२३ लाख कोटी
+ कोविड वॅक्सीनसाठी ३५ हजार कोटी
+ आत्मनिर्भर योजना ६४,१८० कोटी
+ वायु प्रदुषण : २२१७ कोटी
+ पायाभूत सुविधा २० हजार कोटी
+ स्वच्छता अभियान : ७१ हजार कोटी
+ जल जीवन : २.८७ कोटी
+ परिवहन : १.९७ कोटी रूपये
+ प.बंगाल, आसाम, तमिळनाडूत रस्ते प्रोजेक्टसाठी मोठी घोषणा
+ विमा कायद्यात बदल
+ विमा क्षेत्रात ७४ टक्के एफडीआय आणले जाणार
+ ७५ हजार हेल्थ सेंटर

Leave a Comment