अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तर दुसरीकडे सोन्याचे दर झाले ढूस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, आजच्या अर्थसंकलीय भाषणामध्ये अर्थमंत्री सीतारामन यांनी सोन्या-चांदीवरील आयात शुल्क २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आज दुपारी १ वाजता सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण झाल्याने आता सोन्याचा भाव प्रति १० ग्रामसाठी ४८,१२३ इतका कमी झाला आहे.

असं असलं तरी चांदीच्या दारात मात्र आज वाढ झाली आहे. आजच्या वाढीमुळे प्रति किलोग्रॅम चांदी ७२,८७० रुपयांवर जाऊन पोहचली आहे.

Leave a Comment