भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा! यांनी केली मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-जामखेड येथील निवारा बालगृहाच्या कार्यक्रमात व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या पराभवाचे खापर औरंगाबाद येथील काही दैनिक व त्यांच्या पत्रकारावर फोडून त्यांना अर्वाच्च भाषेत शिव्याची लाखोळी वाहीली या घटनेचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या प्रांगणात निवारा महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते भास्करराव पेरे पाटील होते त्यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाला ही बातमी सर्व मिडीयाने प्रमुख बातमी केली तसेच

दैनिकांनी पराभवाचे विश्लेषण काय पध्दतीने केले ते सांगताना तसेच पत्रकारांना हलकट, हरामखोर, बांडगूळ अशी विशेषने वापरून टोलनाक्यावर भिक्षा मागायला ठेवले पाहिजे यांना कोणी पत्रकार केले अशी मल्लिनाथी केली. परभव झाला की त्याचं खापर कोणाच्या तरी माथी फोडावं लागतं..

आदर्श गाव पाटोदयाचे सरपंच भास्कर पेरे यांना निवडणुकीत गावच्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली.. त्याचा राग पत्रकारांवर काढत त्यांनी जामखेड येथील एका कार्यक्रमात व्याख्यान देताना पत्रकारांना अर्वाच्च शिविगाळ करीत आपली अवकात दाखवून दिली..

जे पत्रकारांच्या जिवावर मोठे झाले त्यांना नाव ठेवण्याचे काम केले असे व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देण्यात आले या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती होती याबाबत तुमच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!