भामट्यांनी दुचाकीस्वाराला अडवून लाखो केले लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-नगर शहरासह जिल्ह्यात लुटमारी, चोऱ्या, आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोरटे नागरिकांना लुटत आहे यामुळे या भामट्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच दिसून येत आहे.

नुकतेच राहुरी तालुक्यात भामट्याने पोलीस असल्याचे भासवत एका राहुरी फॅक्टरी येथील व्यापाऱ्याला चार लाखांचा गंडा घातला. याबाबत अधिक माहिती अशी कि,

राहुरी येथील किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्टँड येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन शांती चौकातील दुसऱ्या दुकानात जात होते.

दरम्यान एका स्पीड ब्रेकर जवळ पल्सर गाडी घेऊन एक भामटा त्यांना आडवा झाला व मी पोलिस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवू लागला.

तुमच्या गोणीत गांजा असल्याची माहिती मला मिळाली असून मला तुमची झडती घ्यावयाची आहे असा दम भरला. त्या ठिकाणी असलेल्या त्या भामट्याचा एका साथीदाराने भामट्यांच्या आदेशावरून तोही स्वतःचे खिसे उघडून त्याला दाखवू लागला.

हे चालू असताना त्याने ताथेड यांना अगोदर तिथे गोणी रिकामी करायला सांगितले. नंतर गळ्यातली सोन्याची चेन व अंगठी गोणीत टाकण्यास सांगितले.

दरम्यान काही कळण्याच्या आत भांबावलेल्या ताथेड यांच्याकडून त्या भामट्याने गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी घेऊन पोबारा केला. याबाबतची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

Leave a Comment