नादुरुस्त रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; नागरिकांनी प्रशासनाला दिला इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- नगर – मनमाड महामार्गावर असलेल्या बारागाव नांदूर फाटा येथे अनेक अपघातांची मालिका सुरूच आहे.

नागरिकांचे जीव जात आहेत तरी देखील या रस्त्याची दुरुस्तीसाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिक त्रासले आहे.

बारागाव नांदूर हे गाव सधन गाव म्हणून परिचित आहे. या रस्त्यावरून नांदूरसह कुरणवाडी, वावरथ, जांभळी, जांभूळबन, चिंचाळे, गडधे आखाडा व आजूबाजूच्या वाड्यावस्त्यातील ग्रामस्थांचे दळणवळण होते.

बारागाव नांदूर फाटा हा नगर मनमाड हायवेवर असून या फाट्यावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाही. किंवा रस्त्यावर स्पीड ब्रेकर नाहीत.

या अगोदरही असे अपघाताचे प्रकार होऊन अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर अनेकजण अपंग झाले आहेत. अनेक वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर झालेल्या एका बंडू नारायण गाडे नावाचा तरुण मृत्यूमुखी पडला. विशेषबाब म्हणजे फाट्यापासून हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे,

एवढे अपघात होऊनही प्रशासन मात्र निर्धास्त आहे. या संदर्भात अनेकदा संबंधित खात्यास निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

संबंधित खात्याने बारागाव नांदूर फाट्यावर तातडीने दिशादर्शक फलक व स्पीड ब्रेकर न लावल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment