विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सोनईतील ‘त्या’ तीन जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे.पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (वय २०) हिने घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली.

बाबासाहेब कुंडलिक कोल्हे (रा. यशवंतनगर) यांनी फिर्याद दिल्यानंतर पती शंकर बाबासाहेब भुसारी, सासरे बाबासाहेब कुंडलिक भुसारी व सासू रुख्मिणी बाबासाहेब भुसारी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२१ नुसार भा.दं.वि. ३०४ (ब) ३०६, ४९८, (अ) ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी पक्की करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे याकरीता मयत राणीस दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करत उपाशी ठेवत होते. ती सप्टेंबर २०२० पासून हा त्रास सहन करत होती. या छळाला कंटाळून अखेर तीने आत्महत्या केली.

उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सोमनाथ झांबरे पथकाने पती व सासऱ्यास अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button