संपर्क : 9422736300 I 9403848382

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेलचालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली.

याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणार्‍या महिलेला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरीतील बसस्थानकासमोरील हॉटेल ऐश्वर्या येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता.

Advertisement

याबाबत पोलीस प्रशासनाला खबर मिळताच श्रीरामपूर येथील पोलीस पथकाने हॉटेल ऐश्वर्या येथे छापा टाकून धाडसी कारवाई केली. यावेळी दोन पुरूषांना आणि हॉटेलचालकाला ताब्यात घेतले.

तर वेश्या व्यवसाय करणार्‍या तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान राहुरी येथील एक कॉलेज तरूणी राहुरी फॅक्टरी येथून राहुरीकडे येत असताना ती एका रिक्षामध्ये बसली.

Advertisement

यावेळी रिक्षाचालक व एक महिला रिक्षामध्ये बसलेले होते. रिक्षामध्ये असलेल्या महिलेने त्या कॉलेज तरूणीचा गळा दाबून गप्प केले. रिक्षा राहुरी कॉलेजजवळ आली.

यावेळी त्या तरूणीने चालत्या रिक्षामधून उडी मारली. आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी परिसरातील काही तरुण तिच्या मदतीसाठी धावले.

Advertisement

यावेळी त्या तरूणीने घडलेली घटना त्या तरूणांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या कॉलेज तरूणांनी त्या तरूणीची सुटका करून तिला ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात आणले. याबाबत राहुरी पोलिसांत सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button