तोतया पोलिसाने व्यापाऱ्याचे चार तोळे सोने भरदिवसा लुटले

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- तोतया पोलीस बनून आलेल्या भामट्यानी राहुरी फॅक्टरी येथील व्यापार्‍याचे 4 तोळे सोने लंपास केल्याची घटना धोकादायक घटना सोमवारी दुपारी 2 वाजता राहुरी फॅक्टरी हद्दीतील कराळेवाडी शांती चौक परिसरात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्टँड येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन शांती चौकातील दुसर्‍या दुकानात जात होते.

दरम्यान एका स्पीडब्रेकरजवळ पल्सर गाडी घेऊन एक भामटा त्यांना आडवा झाला व मी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवू लागला.

तुमच्या गोणीत गांजा असल्याची माहिती मला मिळाली असून मला तुमची झडती घ्यायची, असा त्या व्यापार्‍याला दम भरला. घाबरलेल्या व्यापाऱ्याने त्याला पोलीस समजून तो बोललं तसे ऐकले.

आपला प्रयन्त यशस्वी होत असल्याचे दिसताच भामट्याने त्याच्याच एका साथीदाराची देखील झडती घेतली. ही झाडाझडतीचे सत्र सुरू असताना त्याने ताथेड यांना अगोदर तिथे गोणी रिकामी करायला सांगितली.

नंतर गळ्यातली सोन्याची चेन व अंगठी गोणीत टाकण्यास सांगितले. दरम्यान, काही कळण्याच्या आत भांबावलेल्या ताथेड यांच्याकडून त्या भामट्याने गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी घेऊन तेथून पोबारा केला. याबाबतची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button