कोरोनामुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे.

डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 916 संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 156 संस्थांच्या निवडणूकांचा समावेश आहे. या निर्णयानुसार, सहकारी साखर कारखाने, बाजार समित्या, सोसायट्या, पतसंस्था, दूध संघ, सहकारी बँकाच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्राधिकरणाने जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.

आता सरपंच पदाच्या निडणुकाही जाहीर झाल्यात. त्यातब आता सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button