धंनजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि,

मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती देखील सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी आपल्यास सहकार्य केले नाहीतर आपण २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे सबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचं याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची करुणा शर्मा यांची मागणी आहे.

कोण आहे करुणा ? मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो.

ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली.

सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात.

माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली असल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button