प्रवरा नदीपात्र शिवारात बिबट्याचे बछडे आढळले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने बघाबरतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीपात्राच्या लगतच्या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असतानाच राहुरी तालुक्यातील तिळापूर- वांजुळपोई येथील प्रवरा नदीपात्र शिवारातील जगताप यांच्या शेतात नवजात बिबट्याचे एक बछडेआढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी बिबट्याचे बछडेयेथील शेतकऱ्यांना निदर्शनास आढळून आले. साधारण २५ ते ३० दिवसांचेहे बछडे असल्याचे वनधिकाऱ्यांनी सांगितले.

येथील नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली असता राहुरीचे वनविभागाचे पवन निकम, गोरक्षनाथ मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बछड्याला ताब्यात घेतले.

सध्या परिसरात रात्रीचा वीजपुरवठा असल्याने कांदा, व गहू पिकांसाठी पाणी भरण्यासाठी शेतात रात्री शेतकऱ्यांना जावे लागत आहे, वनविभागाने शेतकऱ्यांची तक्रार गांभिर्याने लक्षात घेऊन तिळापूर – वांजुळपोई शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Leave a Comment