ह्या कारणामुळे सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला अटक !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश पवारला चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश फरार झाला होता.

एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाडही टाकली होती. त्या वेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थांचे संबंध उघडकीस आले. एनसीबीने धडक कारवाई करत सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अनेकांवर अटकेची कारवाई केली.

अनेकांची चौकशी केली. या वेळी सुशांतसिंह राजपूतचा मॅनेजर ऋषिकेश पवारच्या विरोधात अनेक पुरावे एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाले होते. त्या वेळी अटक टाळण्यासाठी ऋषिकेशने सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते, मात्र तेव्हापासून त्याचा पत्ता नव्हता.

एनसीबी अधिकारी ऋषिकेश पवारचा शोध घेत होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतचा नोकर दीपेश सावंत याच्या चौकशीतही ऋषिकेश पवारचे नाव आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button