विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- एका विवाहितेचा बँजो संच घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणावेत.

या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ करुन दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घराबाहेर काढून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

Advertisement

दरम्यान हा संतापजनक प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे  घडला आहे. या प्रकरणी  विवाहिता परवीन राजमहंमद शेख यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार सासरच्या पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, विवाहिता परवीन राजमहंमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,

Advertisement

पती राजमहंमद उस्मान शेख, सासरा उस्मान बालम शेख, भाया अश्पाक उस्मान शेख, दीर अस्लम उस्मान शेख आणि नणंद नजमा राशिद खान यांनी 24 मे, 2004 पासून ते जून 2017 पर्यंत बँजो संच घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणण्याचा तगादा लावला.

यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ केला, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुलांसह घराबाहेर काढून दिले असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

यावरुन पोलिसांनी वरील सासरच्या पाचही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार आर.व्ही.खेडकर हे करत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button