खुशखबर… खिलाडी अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ या दिवशी रिलीज होणार

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा 2020 मध्ये प्रदर्शित होणारा सूर्यवंशी हा सिनेमा कोरोनामुळे रिलीज होऊ शकला नाही.

लॉकडाऊनमुळं या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे प्रेक्षकांचा देखील हिरमोड होऊ लागला होता. अखेरीस अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सूर्यवंशी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

हा सिनेमा 2 एप्रिल 2021 ला प्रर्दर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंह देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं असून अक्षय कुमारचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत होते.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात रोहित शेट्टी आणि चित्रपटाचे सह-निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट देखील सध्या थिएटरच्या मालकाशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button