अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-श्री साई बाबा संस्थानच्यावतीने दोन पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. साई बाबा संस्थानचे अधिकाऱ्यांनी नुसत्या पत्रकारच नव्हे तर शिर्डी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरीक यांच्यावर दहशत बसावी यासाठी केलेला हा निंदनीय प्रकार आहे.

अशा हुकुमशाही पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी जर शासन सेवेत असतील तर लोक सुरक्षित राहणार नाही आणि त्यांना न्याय मिळणार नाही.

त्यामुळे संस्थानचे अधिकारी रविंद्र ठाकरे व कान्हुराज बगाटे यांना शासकीय सेवेत ठेऊ नये, अशी मागणी मी स्वत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिपाडा म्हणाले, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय आणि संवेदनशील देवस्थान आहे. या ठिकाणी नम्र स्वभावाचा अधिकारी असावा,लोकांशी सुसंवाद असावा.

साईबाबा संस्थानचे नाव खराब होऊ नये अशी भुमिका येथील अधिकारी वर्गाने घेणे अपेक्षित आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी असलेले अधिकारी मनमानी निर्णय घेत आहे.

पत्रकारांना व ग्रामस्थांना आतमध्ये जाण्यास बंदी करतात. आत जायचे असेल तर परवानगी घ्यावी लागते,अशी हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेतले जात आहे,याचा मी निषेध करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button