लक्ष द्या ! शहरातील पाणीपुरवठ्यात बदल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-महावितरण कंपनी दुरुस्तीसाठी शनिवारी (ता. 6) दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेतपर्यंत शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे महापालिकेचा मुळा पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा बंद राहणार आहे.

या दरम्यान पाणीपुरवठा पाईपलाईनवर दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे नियोजित वेळेनुसार शहराला पाणीपुरवठा होणार नाही.

शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळेरोड, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरूडगाव रोड परिसर व सावेडी गावठाण या भागाला रविवारी (दि. 7) पाणीपुरवठा होणार नाही.

बोल्हेगाव, नागापूर, सोवाडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर, या भागात शनिवारी (दि. 6) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

त्याऐवजी रविवारी (दि. 7) पाणीपुरवठा होईल. त्याऐवजी सोमवारी (दि. 8) पाणीपुरवठा होईल. मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको,

प्रेमदान हडको, म्युनिसीपल हडको, सावेडी या भागाला सोमवार (दि. 8) ऐवजी मंगळवारी (दि. 9) पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button