प्रलंबीत मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-  शेवगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत. त्यामध्ये विनापरवाना वाळू तस्करी, जुगार,मटका, या सारखे अनेक अवैद्य धंदे चालू आहेत.

त्याकडे आपण लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, या मागणीचे लेखी निवेदन नॅशनल ॲन्टी करप्शन अँड क्राईम कंन्ट्रोल ब्युरो संघटने तर्फे शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना देण्यात आले.

दरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या खात्यातील काही अधिकाऱ्यांमुळे अवैद्य धंदा करणाऱ्यांना संधी मिळते.

आपल्या खात्यातील काही अधिकारी गोरगरीब जनतेचे प्रश्न ऐकून घेत नसल्यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होतो, चिरीमिरी दिल्याशिवाय गरिबांची कामे होत नाहीत.

काही स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब कमी धान्य देतात, आपण या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Comment