खंडणी मागणारे ‘ते’तिघेजण जेरबंद कांदा मार्केटमध्ये नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  येथील नेप्ती कांदा मार्केट येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली आहे. अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर अहमदनगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा. एकनाथनगर केडगाव ), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता जि अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फोनवर वारंवार फोन करून तू जमिनीचा व्यवहार मोडला, म्हणून तुला पैसे द्यावे लागतील अशी फोनद्वारे तसेच दुकानात येऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने २० हजार रुपये मागितले. त्यानंतर ४ फेब्रुवारीला दुपारी४ वाजता अक्षय दिलीप कोके व त्याच्याबरोबर एक अनोळखी इसम यांनी गाळ्यात येऊन हर्षवर्धन महादेव कोतकर यास फोन लावून देऊन २०,००० रुपये देण्यास सांगितल्याप्रमाणे अक्षय दिलीप कोके यांचेकडे पैसे दिले.

त्यानंतर कोके याने कोतकर याला फोन करून सांगितले की, पैसे मिळाले आहेत. मात्र त्याचवेळी साध्या गणवेशात बसलेल्या पोलिसांनी आरोपी कोके व त्यासोबत असलेल्या अनोळखी इसम याला पकडून ताब्यात घेतले. यानंतर व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (वय ३३ रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेल्या आरोपीविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,

तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button