चंद्रकांत पाटलांनी एपीजे कलामांना बदनाम करू नये !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- एपीजे कलाम यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते सर्वसंमतीने राष्ट्रपती झाले होते. त्यांची निवड नरेंद्र मोदींनी केली होती असे म्हणून एका देशभक्ताला बदनाम करण्याचे पाप पाटील यांनी करू नये, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केले असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांनी ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थक करून दाखवली आहे,असा टोला लोंढे यांनी लगावला. वाजपेयी यांनी गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदींना राजधर्माचे पालन करण्याचा आदेश दिला होता पण तो त्यांनी न पाळता मूठभर लोकांसाठी काम केले.

Advertisement

कलाम यांनी देशाला २०२० मध्ये जागतिक महासत्ता करण्याचे स्वप्न दाखवून एक कार्यक्रमही दिला होता. सध्या कोणत्याही गोष्टीचे श्रेय मोदींना देण्याचा भाजपा नेत्यांचा आटापिटा असतो तेच पाटील यांनी केले पण वस्तुस्थिती लोकांना माहिती आहे, असे लोंढे म्हणाले.

Advertisement
Back to top button