संपर्क : 9422736300 I 9403848382

शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-विजेच्या शॉर्टसर्किटने एक एकर ऊस आगीत जळून खाक झाला. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात घडली.

यात  जयवंत किसन जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी देखील याच ठिकाणी तारांमध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण झाले होते.

Advertisement

त्यात पाचेगावातील संतोष भाऊसाहेब साळुंके या शेतकऱ्याचा ऊस आगीतून वाचविण्यात यश आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी सध्या धास्तावले दिसत आहेत. जयवंत किसन जाधव (रा.गुजरवाडी, ता.श्रीरामपूर) यांची पाचेगाव शिवारात सहा एकर शेतजमीन आहे.

शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शेतातील वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन तयार झालेले आगीचे लोळ उसाच्या शेतात पडल्यामुळे एक एकर ऊस आणि प्लास्टिक पाईप आगीत जळून खाक झाले. या शेतकऱ्यांचे सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

Advertisement

Back to top button