Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार !

364

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. 

मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Advertisement

अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कार(क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे.ह्या भीषण अपघातात मयत जालना जिल्ह्यातील आहेत.

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलिस नाईक अशोक नागरगोजे,पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले परंतु सर्व पाच ही जण उपचारापूर्वीच मयत झाले आहे.

Advertisement

अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती.

Advertisement