छत्रपतींच्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- जुन्या पंचायत समिती आवारातील छत्रपतींचा पुतळा नव्या पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही.

सुशोभीकरणाचा खर्च आमदार निधीतून करू छत्रपती शिवरायांची शिकवण दैनंदिन आचरणात आणून लोक कल्याण साधण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

पंचायत समितीच्या आवारात छत्रपतींच्या पुतळ्यांच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड, उपसभापती मनीषा वायकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, गटनेते सुनील ओव्हाळ, विष्णुपंत अकोलकर, गट विकास अधिकारी शीतल खिंडे, भाजप महिला आघाडीचा काशीबाई गोल्हार आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड व सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्याच्या कामासाठी विशेष परिश्रम घेतले. अल्पकालावधीत परिस्थितीचा विचार करत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी पुतळा स्थलांतरास परवानगी दिली.

छत्रपतींचे कार्य व व्यक्तिमत्त्व एवढे प्रेरणादायी आहे की त्यांच्या केवळ स्मरणाने ऊर्जा मिळते. पुतळा उभारणीचा उर्वरित खर्च पंचायत समिती सेस फंडातून केला जावा. पंचायत समितीची जुनी इमारत अतिक्रमणांनी वेढलेली असून गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कर्मचारी वसाहत नव्याने सुरू करून अन्य विभाग तिकडे सुरू करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करावा.

मध्यवर्ती भागात मोठी वस्तू सुस्थितीत आहे. तिचा वापर करावा. प्रास्ताविक सुभाष केकाण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोरवणे यांनी केले. उपस्थितांचे आभार एकनाथ आटकर यांनी मानले. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन जुन्या बसस्थानक चौकात झाले.

मनसेच्या वतीने नवीन बसस्थानकासमोर तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवपूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button