Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

जिनींग प्रेसला भीषण आग; 3 कोटींचा माल जळून खाक

92

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-शेवगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील एका जिनींग प्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या आगीमुळे जवळपास तीन कोटीचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

Advertisement

शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे नगर राज्यमार्गालगत असणार्‍या वाय.के.कॉटन अ‍ॅण्ड जिनिंग मिलला सोमवारी पहाटे साडेचार वाजता शॉटसर्किटने आग लागली.

ही आग मिलच्या शेजारी राहणार्‍या गोरक्ष बोरुडे यांच्या लक्षात आल्याने त्यांणी तातडीने जिनिंग मालक प्रविण शिंदे व नामदेव निकम यांच्याशी संपर्क साधला.

Advertisement

सदर मालक घटनास्थळी येईपर्यंत तेथील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पंरतु वारे असल्याने ही आग अधिकच भडकली. या दरम्यान अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.

यानंतर वृध्देश्वर व ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशामन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले. या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

Advertisement

आगीत 70 ते 80 लाखांचे बेलप्रेसिंग मशीन, 2 कोटीच्या 900 ते 1 हजार कपाशीच्या गाठी असे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Advertisement