संपर्क : 9422736300 I 9403848382

धक्कादायक ! लॉकडाउनच्या चिंतेने त्याने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीती पसरली आहे.

दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता प्रशासन देखील आक्रमक पाऊले उचलू लागली आहे. नुकतेच काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.

Advertisement

तर नगर जिल्ह्यातही लोडाऊन केला जाणार कि काय ? या चिंतेने एकाने चक्क आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

विष्णू गांगुर्डे असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव असून हा तरुण राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याचे समजते आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि , विष्णू बाबासाहेब गांगुर्डे (वय ३० वर्षे राहणार गौतम नगर, रेल्वे स्टेशन, राहुरी). हा तरुण मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता.

तसेच त्याने बचत गटातून कर्ज काढले होते. काही प्रमाणात मित्रांकडून हातउसने रूपये घेतले होते. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे.

Advertisement

त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे व ऊसने घेतलेले रूपये परत कसे करायचे याची चिंता विष्णूला काही दिवसांपासून सतावत होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली.

अशी माहिती विष्णूच्या मित्रांकडून मिळाली. गांगुर्डे याने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या ॲगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

घटना समजताच त्याच्या काही मित्रांनी त्याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

विष्णूच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Back to top button