संपर्क : 9422736300 I 9403848382

सहकारी बॅँकनंतर आता सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यापाठोपाठ जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या.

निवडणुकीचे वातावरण शांत होते तोच आता जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात पूर्ण करण्याचे आवाहन सहकार विभागाकडे आहे.

Advertisement

यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक संपताच राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९ सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी 22 पासून उमेदवारी विक्री आणि दाखल करण्यास सुरूवात झाली असून 27 तारखेपर्यंत यास मुदत आहे.

Advertisement

निवडणूका होणार्‍या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक या श्रीगोंदा तालुक्यातील 13 असून संगमनेर तालुक्यातील 8 संस्थांचा यात समावेश आहे.

असा असणार निवडणूक कार्यक्रम 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज विक्री आणि दाखल करणे, 1 मार्चला छानणी, 2 मार्चला उमेदवारांची यादी, 16 मार्चपर्यंत माघार आणि 17 मार्चला चिन्हाचे वाटप करण्यात येवून अंदाजे 26 ते 29 मार्च दरम्यान या निवडणूका पारपडणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यावर लगेच मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Advertisement

Back to top button