नागरीकांनी कुत्रे पकडून नगरपंचायतमध्ये आणून सोडा आणि बक्षीस मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शिर्डी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एकीकडे मोकाट कुत्रे वाढत आहे तर दुसरीकडे शिर्डी नगरपंचायतचे सत्ताधारी गट आणि मुख्याधिकारी अत्यंत निष्क्रिय पद्धतीने परिस्थितीत हाताळत आहे.

दरम्यान या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनीही आपल्या परिसरातील कुत्रे नगरपंचायतमध्ये आणुन सोडा आणि बक्षीस मिळवा अशी ऑफर शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी दिली आहे..

दरम्यान शिर्डी आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असल्याने याठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून शहर स्वच्छतेबरोबरच शहरात वाढलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. शहरातील अनेक उपनगरात मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.

याप्रश्नी कमलाकर कोते यांनी नगरपंचायतच्या सत्ताधारी गटावर कुत्र्यांचा बंदोबस्त प्रकरणाविषयी ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी सांगितले की सत्ताधारी आणि मुख्याधिकारी निष्क्रिय असून याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे.

यादरम्यान शहरातील मोकाट कुत्रे साईभक्तांना, आबालवृद्धांना व लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे नाईलाजस्तव कोते यांनी कुत्रे नगरपंचायतमध्ये आणून सोडले आहे.

नगरपंचायतने जर हे कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली नाही तर शिर्डी शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपल्या परिसरातील कुत्र्याचे पिल्लू धरून आणल्यास प्रत्येक पिल्लुसाठी दहा रुपये

तर मोठे कुत्रे आणल्यास पन्नास रुपये आणी डुकर आणल्यावर शंभर रुपये माझ्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच हे मोकाट कुत्रे नगरपंचायतमध्ये आणून सोडावे असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button