निवडणूक रणधुमाळी ! मनपा स्थायी समितीची सभापती निवडणूक तारीख जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पार पडली तोच जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूका पार पडल्या.

दरम्यान आता नगर मनपाच्या स्थायी समितीची सभापती निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सभापती निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडणूक पार पडणार असल्याचे मनपा कडून सांगण्यात आले.

Advertisement
Back to top button