शिर्डी नगरपंचायत कार्यालयात सोडले मोकाट कुत्रे!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी शहरातील मोकाट कुत्र्यांचा वारंवार सांगूनही बंदोबस्त करत नसल्याने शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडले.

यावरही अजून कुणी मोकाट जनावरे नगरपंचायतीत आणून सोडल्यास त्यांना बक्षिस दिले जाईल, असेही जाहीर केले आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास शिर्डी नगरपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप करत कोते यांनी नागरीकांना आपल्या परिसरातील मोकाट कुत्रे,

मांजर व डुक्कर नगरपंचायतमध्ये आणून सोडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी बक्षीस योजना जाहीर केली आहे.

याबाबत कोते यांनी सांगितले की, शहरात व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या कुत्र्यांनी अनेक भाविकांचा व नागरीकांचा चावा घेतलेला आहे. एरवी नागरीकांकडून भरमसाठ कर घेणाऱ्या नगरपंचायतचा सत्ताधारी गट व मुख्याधिकारी या प्रश्नाबाबत पुर्णपणे अपयशी ठरले आहेत.

त्यामुळे सायंकाळी नगरपंचायतमध्ये मोकाट कुत्रे आणून सोडले आहेत, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button