लक्ष द्या ! मार्च महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्च महिना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही कामे असतील आणि तुम्ही ती पुढे ढकलणार असाल तर एकदा कॅलेंडर पाहा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल.

मार्चमध्ये बँका 11 दिवस बंद असणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह एकूण 11 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल.

त्यापैकी 5 मार्च, 11 मार्च, 22 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च रोजी बँकाना सुट्टी असेल. त्याशिवाय रविवार आणि दुसऱ्या शनिवारीही बँका बंद राहतील.

म्हणजेच, एकूण 11 दिवस बँकांमध्ये काम होणार नाही. मार्च 2021-22 चे नवीन आर्थिक वर्ष मार्चच्या सुरूवातीस सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सुट्टीमुळे बँकेच्या शाखा बंद राहिल्या तरीही आपण इंटरनेट बँकिंगद्वारे आपल्या बरीच कामे करु शकता.

या सुट्ट्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या निषेधार्थ बँक कर्मचार्‍यांच्या 9 संघटनांच्या (UFBU) सर्वोच्च संस्थेने 15 मार्चपासून दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे.

महत्वाची सूचना आरबीआयने स्पष्ट केले आहे की, राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या बदलू शकतात. म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे.

Back to top button