खासदार डेलकर यांच्या आत्महत्येचा पोस्‍टमार्टम रिपोर्ट आला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५८) यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. गुजराती भाषेतील चिठ्ठीत काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे समजते आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

खासदार डेलकर आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी दिला होता. याचा अहवाल आला आहे. श्वास बंद झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फॉरेंसिक रिपोर्ट हाती आल्यानंतर कशामुळे मृत्यू झाला आहे. याचे खरे कारण पुढे येणार आहे. दरम्यान मृत खासदार मोहन डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. ही सुसाईड नोट 15 पानांची असून,

ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं तसेच डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस दलातील IPSअधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ते उच्चस्तरीय संपर्कात आहेत.

  • त्या दिवशी नेमके काय घडले होते?
  • मोहन यांच्या वाहन चालकाने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या खोलीचे दार ठोठावले.
  • बराचवेळ मोहन यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चालकाने गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या डेलकर कुटुंबाला ही बाब कळवली.
  • कुटुंबाचेही दूरध्वनी मोहन स्वीकारत नसल्याने अस्वस्थता वाढली.
  • हॉटेल व्यवस्थापनाचे अन्य चावीने दार उडण्याचे प्रयत्न फसल्याने चालकाने शेजारील खोलीच्या गॅलरीतून मोहन यांच्या गॅलरीत उडी घेतली तेव्हा मोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
  • आत्महत्या करणारे मोहन डेलकर कोण होते ? जाणून घ्या

मोहन डेलकर (58) हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले.