धक्कादायक ! तिघा कैद्यांकडून कोठडीत एकाला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-गुन्हा केलेल्या आरोपीना शिक्षा म्हणून त्यांची रवानगी कोठडीत केली जात असते.

कोठडीत जाऊन सुधारण्याऐवजी आपल्या अंगातील दुर्गुण कायम ठेवत कोठडीत एकाला तिघा कैद्यांनी मारहाण केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.

Advertisement

श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिघा कैद्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि. श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या बराकीत सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.

Advertisement

दरम्यान नेहमीप्रमाणे रात्री आलेल्या जेवणात भाजी घेण्यावरून तीन कैद्यांनी एका जणाशी हुज्जत घातली. त्याला पाणी पिण्याच्या भांड्याने मारहाण केली.

तिघा जणांच्या आधी जेवण घेतल्याने आलेल्या रागातून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळते आहे.

Advertisement

दरम्यान या प्रकरणी जखमी संदीप कांबळे याच्या फिर्यादीवरून अक्षय गांगुर्डे, किरण चिकणे, सधीर सरकाळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Back to top button