….म्हणून माजी महापौर म्हणाले नगरकरांनो काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा आलेख उंचावत असल्याने महानगरपालिकेने बंद केलेले कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.

यापार्श्वभूमीवर नगरकरांनी सावधनता बाळगून करोना प्रतिबंध नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. दरदिवशी वाढती आकडेवारी ही प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठी देखील एक चिंतेची बाब ठरत आहे.

याच पार्शवभूमीवर नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना कळमकर यांनी म्हटले आहे की,

राज्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मी जबाबदार मोहिमेची घोषणा करून नागरिकांना मास्क वापर, सोशल डिस्टन्सिंग,

सॅनिटायजरचा वापर याबाबत पुन्हा आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास लॉकडाऊनचा पर्याय अवलंबवा लागेल असा सूचक इशाराही सरकारने दिला आहे.

नगरमध्येही जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हे निर्बंध आणखी वाढू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

कारण आता संपूर्ण लॉकडाऊन अजिबात परवडणार नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. नगर शहरात मास्क वापरणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे,

सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर करोनाचा झपाट्याने प्रसार होवू शकतो. करोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था टाळणे आपल्याच हातात असून प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज असल्याचे कळमकर यांनी म्हटले आहे.

Back to top button