…तर तुम्हाला शिर्डीतील साई मंदिरात प्रवेश मिळणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

आता साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. तसेच राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे शिर्डी येथील साई मंदिर खुले राहणार कि पुन्हा बंद होणार याबाबत भाविक संभ्रमित झाले आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणची मंदीरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

असे असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. आगाऊ बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

दररोज सुमारे पंधरा हजार भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. याचे नियोजन करता यावे यासाठी ऑनलाइन दर्शनपास पद्दत सुरू करण्यात आलेली आहे. असे पास असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

त्यामुळे भाविकांनी शिर्डीत येण्यापूर्वी ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे, असे आवाहन साईबाबा संस्‍थानतर्फे करण्‍यात आलेले आहे. काळात येताना भाविकांनी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे.

पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे.

या बाबींची काळजी घ्या :-

  • मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.
  • दहा वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षांवरील व्‍यक्‍तींनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पुजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  • जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये.
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । 
  • © Copyright 2021, all rights reserved