Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोनामुळे गेल्या ४८ तासात जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू

994

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. नागरिकांचा बेशिस्तपणा हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

Advertisement

दरम्यान जिल्ह्यात गेल्या ४८ तासात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी १७८, तर मंगळवारी १५९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ८९९ इतकी आहे, अशी महिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या कोरोनाबाबतच्या माहितीमध्ये रविवारी (दि. २१) रोजी जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ११२१ इतकी दिली होती.

Advertisement

ती संख्या सोमवारी (दि. २२) ११२४ इतकी झाली. म्हणजे सोमवारी ३ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २३) हीच संख्या ११२९ इतकी आहे. म्हणजे एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्याने यंत्रणाही सतर्क झाली आहे. तसेच जिल्ह्यात मंगळवारी १३७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Advertisement

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९७.२९ टक्के इतके झाले आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

Advertisement

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement