जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 69 हजार 240 रुपये हस्तगत करून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौघेजण तेथून पसार झाले.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली कि,

Advertisement

तालुक्यातील हरेगाव ते उंदिरगाव जाणार्‍या रोडवर एका टपरीच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत.

मिटके यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता

Advertisement

आरोपी सचिन लक्ष्मण गायकवाड (वय 39) रा. उंदीरगाव, दीपक मेघन भोसले (वय 45) रा.डी. क्वार्टर, मयूर सर्जेराव पगारे (वय 24) रा. उंदीरगाव, यांचेकडून 69,240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

अन्य चार आरोपी पसार आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisement

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
Back to top button