Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

रेखा जरे हत्याकांड : अब बाळ बोठे तो गये…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला

पुर्ननिरीक्षण अर्ज न्यायालयाकडून फेटाळल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून आता पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांनी त्या कारवाईसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .

Advertisement

बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने दिलेल्या स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये पुर्ननिरीक्षण अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन बाळ बोठे याने दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पत्रकार बाळ बोठे विरुद्धच्या पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांनी बाळ बोठेचा नेहमी संपर्कात येत असलेल्यांपैकी काहीजणांचे जबाब घेतलेले आहे तर अन्य ३० ते ४० जणांचे जबाब सुद्धा पोलिसांनी रेखा जरे यांच्या खुनाच्या घटनेमध्ये नोंदलेले आहे तसेच पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीची चौकशी सुद्धा पोलिसांनी सुरू केली होती. त्याची माहिती एकत्रितपणे गोळा करण्यात येत होती.

Advertisement

पोलिसांनी त्याच्या असलेल्या एका ट्रस्टची सुद्धा माहिती मागवलेली आहे. त्या ट्रस्टमध्ये कुणीकुणी कशा स्वरूपाचे पैसे दिले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यातच आता न्यायालयाने त्याचा पुर्ननिरीक्षण अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता त्याच्या संपत्तीवर टाच आणून तिचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

Advertisement

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li