Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अखेर रेखा जरेंच्या मुलानं घेतला निर्णय, आईसाठी करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या होवून ८७ दिवस उलटले आहेत.

मात्र या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरारच आहे.याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही?

Advertisement

कोणी त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे यांचा मुलगा रुणाल याने दि.५ मार्चपासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नुकतेच दोषारोपपत्र दाखल केले, मात्र, मुख्य सूत्रधार अद्याप फरारच आहे. जरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे उपोषणाचा इशारा दिला आहे.

Advertisement

यात नमूद केले आहे की, माझ्या आईच्या (रेखा जरे) हत्येला ८७ दिवस उलटले आहेत. तरीही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. एवढे सक्षम अधिकारी असतानाही आरोपी कसा सापडत नाही.

त्यामुळे पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे प्रकरण दडपण्याचा तर प्रयत्न सुरू नाही ना? यात कोणी तरी लपवाछपवी तर करीत नाही ना, असे प्रश्न पडले आहेत.

Advertisement

मी व माझे वडील पोलिसांना मदत करायला तयार आहोत. यासाठी आम्ही अधिकारी आणि नेत्यांनाही भेटलो. मात्र, त्यांच्याकडूनही माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नाहीत.

त्यामुळेच मोठे कट कारस्थान करून या गुन्ह्याची चौकशी दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शंका येते. पोलिसांवर आमचा विश्वास होता.

Advertisement

मात्र, दोषारोपपत्र दाखल झाले तरीही मुख्य आरोपी सापडत नाही. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होऊन शिक्षा होत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

आपण उपोषणाची परवानगी मागितली, मात्र ती दिली नाही. तरीही आपण पाच मार्चपासून उपोषण करणार आहोत. याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असे नमूद कले आहे.

Advertisement
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li