Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : प्रसिद्ध व्यापाऱ्याचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एक प्रसिद्ध व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत.त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते.

त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. हिरण यांची मोटरसायकल श्रीरामपूर-बेलापूर बायपासला उभी आहे. गाडीला चावी व कागतपत्रांची पिशवीही तशीच आहे. हिरण यांची बेलापुरात एका नामांकित कंपनीची एजन्सी आहे.

Advertisement

सोमवारी सायंकाळी गोदामातून बाहेर पडलेले हिरण घरी निघाले होते. मात्र त्याचवेळी एका व्यक्तीने कारचा बिघाड झाला असून हिरण यांच्याकडे मदतीची मागणी केली. या अज्ञात व्यक्तीने जॅकेट घातले असल्याचे काही लोकांनी सांगितले. हिरण यांनी एका मेकॅनिककडून कार दुरुस्तीसाठी साहित्य घेतले होते. ते कार दुरुस्ती करिता निघाले असता व्हॅनमध्ये त्यांना बसवले असे काही लोकांनी पाहिले.

व्हॅनमध्ये बसलेली एक व्यक्ती सोडा सोडा म्हणत दरवाजाला लाथा मारत होती असे श्रीरामपूर-बेलापूर बायपासवरील काही लोकांनी पाहिली. ते वाहन श्रीरामपूरच्या दिशेने गेले. त्यामुळे ती व्यक्ती हिरण होती का? तसेच त्यांचे अपहरण झाले का? अशी चर्चा आहे.

Advertisement
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li