Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अबब! 48 कोटी रुपयांना विकली फक्त 10 सेकंदांची व्हिडिओ क्लिप, जाणून घ्या …

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- जग वेगाने डिजिटलायझेशन होत आहे. या अनुशंघाने केवळ आणि केवळ ऑनलाइन उपलब्ध आणि युनिक असणाऱ्या अशा गोष्टींवर खर्च करण्याचा गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

एक 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप 66 लाख डॉलर (48.44 कोटी रुपये) मध्ये विकली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये, मियामी येथील आर्ट कलेक्टर पाब्लो रोड्रिगूज फ्रेले यांनी 10 सेकंदाच्या कलाकृतीवर 67 हजार डॉलर्स (49.17 लाख रुपये) खर्च केले आणि आता गेल्या आठवड्यात त्याने ते 66 लाख डॉलर (48.44 कोटी रुपये) मध्ये विकले.

Advertisement

संगणकाद्वारे तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प जमिनीवर पडताना दिसत आहेत आणि त्यांच्या शरीरावर अनेक स्लोगन्स आहेत. हा व्हिडिओ एक डिजिटल आर्टिस्ट बीपल यांनी तयार केला आहे ज्याचे खरे नाव माइक विंकलमन आहे. हा व्हिडिओ ब्लॉकचेनद्वारे प्रमाणीकृत करण्यात आला जो डिजिटल सिग्नेचरचा एक प्रकार आहे .

नवीन प्रकारची डिजिटल मालमत्ता (एसेट) आहे एनएफटी :- हा व्हिडिओ नॉन-फंगिबल टोकन (एनएफटी) नावाचा एक नवीन प्रकारचा डिजिटल एसेट आहे. या प्रकारची एसेट ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे प्रमाणीकृत केली जाते ती यूनिक असते तर इतर प्रकारच्या ऑनलाइन वस्तू बर्‍याच वेळा तयार केल्या जाऊ शकतात.

Advertisement

फ्रेले म्हणाले की त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपण मोनालिसा पेंटिंगचे छायाचित्र घेऊ शकता परंतु त्याचे काही मूल्य असणार नाही कारण त्याची उत्पत्ति किंवा वर्क हिस्ट्री नसेल. नॉन-फंजिबल चा अर्थ अशा एसेट्सशी आहे जीची एक्सचेंज होऊ शकत नाही आणि प्रत्येक मालमत्ता स्वतःमध्ये यूनिक आहे,

तसेच फंजिबल एसेट्सअंतर्गत डॉलर्स, स्टॉक्सकिंवा गोल्ड बार्स ठेवल्या जाऊ शकतात. एनएफटी अंतर्गत डिजिटल ऑर्टवर्क्स आणि स्पोर्ट्स कार्डपासून तर वर्चुअल एनवायरमेंट्समध्ये जमिनीचा तुकडादेखील समाविष्ट केला जातो.

Advertisement
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li