This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- मद्याच्या नशेत मोबाइल टाॅवरवर चढलेल्या तरूणाला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहीसलामत खाली उतरवून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या राहुरी खुर्द येथील आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे रविवारी रात्री १० दरम्यान ही घटना घडली.
Advertisement
ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टाॅवरवर चढलेल्या तरूणाला खाली आणले.
याकामी अग्निशमन दलाचे राजेंद्र पवार, नंदू मोरे, विलास गडाख यांनी मदत केली.
Advertisement
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|