Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अन्यथा आत्मदहन करण्याचा भिंगारच्या व्यापार्‍याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाईन चौकात दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैश्यासाठी मानसिक त्रास देणार्‍या महिलेवर कारवाई करुन सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमित कुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

सदर महिले विरोधात कारवाई न झाल्यास दि.15 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमित कुमार संतोष प्रसाद यांचे भिंगार येथे विजय लाईन चौकात स्वत:च्या मालकीचे दुकान आहे. तेथे शीतपेय व खाद्य पदार्थ जिल्ह्यात पुरविण्याचे काम केले जाते.

Advertisement

या दुकानासमोर एका महिलेने अतिक्रमण केले असून, सदर अतिक्रमण काढण्यासाठी सुमित कुमार यांनी तक्रार करुन दि.27 ऑगस्ट 2020 रोजी प्रशासनाच्या मदतीने हटविले होते. परंतु सदर महिने पुन्हा दुकानासमोर दि.4 डिसेंबर 2020 रोजी अतिक्रमण केले व त्यानंतर मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सदर महिला अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देत असून, काही राजकीय पक्ष व संघटना सोबत घेऊन वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सुमित कुमार यांनी केला आहे.

कुटुंबातील कर्ता पुरुष असून, संपुर्ण कुटुंब एकट्यावर अलंबून असून, सदर महिलेपासून धोका निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी महिले विरोधात भिंगार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन घेण्यात आलेला नसून, पोलीस प्रशासन सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Advertisement

दुकानासमोरील महिलेचे अनाधिकृत अतिक्रमण तातडीने हटवावे अन्यथा 16 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुमित कुमार यांनी दिला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

Advertisement
li